Rupali
trending Recipes
-

पाव भाजी कशी बनवायची अगदी सोपी पद्धत आणि hotel style मध्ये
पाव भाजी हा असा पदार्थ आहे तो सर्वानाच आवडतो . लहान असो की मोठे त्यात…
-
पाव भाजी हा असा पदार्थ आहे तो सर्वानाच आवडतो . लहान असो की मोठे त्यात आज आपन बनवणार आहोत अगदी हॉटेल प्रमाणे पाव भाजी ती ही अगदी सोप्या पद्धतीने1)वाटाणे ललेली- अर्धा वाटी2)उकडलेले बटाटे: 2 मध्यम आकाराचे3) फ्लॉवर: 1 वाटी4) गाजर कापलेले: 1 वाटी5) शिमला मिरची: अर्धी वाटी6) बारीक चिरलेला कोथिंबीर: पाव वाटी7)बारीक चिरलेला टोमॅटो: 1 वाटी8) आलं लसूण पेस्ट: 2 चमचे9) बारीक चिरलेला कांदा: 1 वाटी10) पाव भाजी मसाला : 2 ते 3 चमचे11) लाल मिरची पावडर: 1 चमच12) हळद: अर्धा चमच13) बटर/ तूप: 3 चमच14)मीठ: चवीनुसार1) सर्व प्रथम भाज्या स्वच्छ धून घ्यावे. त्यानंतर भाज्या फ्लॉवर, वाटणे, सिमला मिरची, उकडून घ्यावे. उकडलेली बटाटे हे सर्व एकजीव करून घ्यावे2) फोडणी साठी सर्वप्रथम बटर/ तूप त्यात थोड तेल म्हणजे बटर तूप जळत नाही. त्यानंतर लसूण पेस्ट परतून घ्यावे . त्या नंतर बारीक चिरलेला कांदा लाल होई पर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर बारीक चिरलेली टोमॅटो आणि थोडे मीठ म्हणजे टोमॅटो चांगले शिजतात.3) त्यानंतर एकजीव केलेल्या भाज्या त्यात टाकून एक जीव करावे. त्या नंतर चवीनुसार मीठ,लाल मिरची पावडर,पावभाजी मसाला, टाकून एकजीव करावे.4)गरजे नुसार थोडे पाणी टाकून मंद आचेवर सर्व थोड्या वेळ शिजवून घ्यावेअश्या प्रकारे तुमची चविष्ट पाव भाजी तयार झाली अगदी सोप्या पद्धतीने



